राजकीय सूडाचे अविरत प्रयत्न : रॉबर्ट वढेरा

नवी दिल्ली: आपल्याविरोधात अविरतपणे राजकीय सूड घेतला जात असल्याची टीका रॉबर्ट वढेरा यांनी केली आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आर्थिक अफरातफरीची चौकशी करण्यासाठी सक्‍तवसुली संचलनालयाने वढेरा यांना समन्स बजावले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना वढेरा यांनी ही टीका केली आहे.

राजस्थानच्या सीमेजवळील बिकानेरमधील जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी वढेरा यांना हे समन्स बजावले असल्याचे “ईडी’च्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते. आपण गेल्या साडेचार वर्षात सातत्याने सरकारी विभागाला सहकार्यच केले आहे. यानंतरही हे सहकार्य देतच राहणार आहोत. सरकारी विभागांकडून सातत्याने राजकीय सूडबुद्धीने आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे वढेरा यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

-Ads-

यापूर्वी कागदपत्रांसाठी आपल्याला समन्स पाठवले गेले होते. तीन तास बसून राहिल्यवर आपल्या वकिलांनी कागदपत्रांचे गठ्ठे दिले. पण काही वर्षांपूर्वी दिलेल्या त्याच कागदपत्रांसाठी त्यांनी पुन्हा समन्स पाठवले आहे. सुमारे 600 पानांचे दस्तऐवज न पाहता 24 तासात पुन्हा समन्स पाठवण्यात आल्याचा आरोपही वढेरा यांनी केला. आपल्याला प्रसिद्धी माध्यमांमध्ये सर्कस करायला लावली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. वढेरा यांच्याविरोधात राजस्थान पोलिसांनी 2015 सालच्या जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी “एफआयआर’दाखल केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)