मुंबई – शेअरबाजारातून परकीय गुंतवणूक परत जात असल्यामुळे आणि जागतिक व्यापारयुद्धामुळे रुपयाच्या मूल्यातील घसरण चालूच आहे. आज (गुरूवारी) सलग चौथ्या दिवशी रुपयाचे मूल्य कमी झाले. बाजार बंद होताना आज रुपयाचे मूल्य 23 पैशांनी कमी होऊन 69.94 डॉलर प्रति डॉलर या पातळीवर गेले.
क्रुडचे दर कमी होत असले तरी जागतिक विकासदर कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूक मंदावण्याची शक्यता असल्यामुळे रुपयाच्या मूल्यात घट होत आहे, असे विशलेषकांनी सांगितले.
गेल्या चार सत्रांत रुपयाचे मूल्य 72 पैशांनी कमी झाले आहे. त्यामुळे शेअरबाजार आणि इतर क्षेत्रातील गुंतवणूक सोने आणि रोख्याकडे वळत असल्याचे चित्र जागतिक बाजारात निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काही काळात सोने आणि चांदीचे दर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.