सिंगापूर – 6 जूनला रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. बॅंक व्याजदरात किती कपात करेल याबाबत संस्था वेगवेगळे अंदाज जाहीर करीत आहेत.
डीबीएस समूहाने बॅंक यावेळी व्याजदरात पाव टक्का कपात करेल असे म्हटले आहे. दोन वेळा एवढीच कपात केल्यामुळे या वर्षात एकूण कपात 0.75 टक्केपर्यंत जाणार आहे. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेचा रेपो दर 5.75 टक्के होणार आहे.नंतर बॅंकेला व्याजदरात कपात करण्यास कमी वाव असेल.