भारताचा संदेश जगभर पसरविण्याचे अभियान चालू ठेवा

मलावीमधील भारतीयांना उपराष्ट्रपतींचे आवाहन

लिटॉंग्वे – भारताचा संदेश जगभर पसरविण्याचे अभियान चालू ठेवण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेकय्या नायडू यांनी मलावीमधील भारतीय समुदायाला केले आहे. भारताची मूल्य व जीवनपद्धती यांचे सांस्कृतिक राजदूत येथील भारतीयांना व्हावे, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“शेयर अँड केयर’ हा भारतीय तत्वज्ञानाचा मूळ गाभा असून भारतीय समुदाय समजुतदारपणा व सहानूभूतीच्या भावना अधिक वृद्धिंगत करेल, तुमची समृद्धता मलावी बंधु-भगिनी सोबत वाटा व त्यांनाही विकासात भागीदार बनवा, असे त्यांनी यावेळी सांगितले. उपराष्ट्रपती म्हणाले की, भारतीय सांस्कृतिक वारश्‍याने विविध उत्सव धार्मिक उत्साह व सर्व समुदायाच्या सहभागासह साजरा करण्याची प्रथा कायम ठेवली आहे. मलावीच्या आर्थिक घडामोडींमध्ये तुमचे योगदान भक्‍कम व व्यापक असे आहे.

उपराष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या परिवर्तनात्मक सुधारणा आधोरिखित करतांना भारत सुधारणाच्या प्रगतीपथावर क्रमण करत असल्याचे सांगितले. उद्योगाचे वातावरण चांगल्या स्थितीत असल्याचे सांगून त्यांनी भारतीय समुदायाला या परिवर्तनाकडे पाहण्याची व स्थितीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. केंद्रीय समाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, मलावीचे भारतीय उच्चायुक्‍त सुरेश कुमार मेनन व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)