निवडणूक लढविण्याविषयी सेहवागने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आता राजकारणात नवीन इनिंग सुरु करण्याची शक्यता असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी माध्यमांनी दिले होते. भाजपच्या तिकिटावर हरियाणातून सेहवाग निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत होते. रविवारी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यावेळी सेहवागच्या नावावर एकमत झाल्याची माहितीही बैठकीला उपस्थित असलेल्या पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली होती. परंतु, वीरेंद्र सेहवागने ट्विट करत वृत्त फेटाळून लावले आहे.

माहितीनुसार, रोहतक मतदारसंघात कॉंग्रेसचे दिग्गज नेते दिपेंद्र सिंह हुड्डा यांचा पराभव करण्यासाठी वीरेंद्र सेहवागच्या नावाची चर्चा झाली होती. यावर सेहवागने आज ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. सेहवाग म्हणाला कि, गेल्या निवडणुकीवेळीही अशीच चर्चा झाली होती. मात्र तसे काही झाले नाही. आताही तशीच चर्चा सुरू आहे. मात्र त्यात कोणतेही तथ्य नाही. मला निवडणूक लढवण्यात तेव्हाही रस नव्हता आणि आताही नाही, असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे. यावेळी त्यांनी २०१४ निवडणुकींमधील आणि आताच्या वृत्ताचा एक फोटो शेअर केला.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी ही सेहवागला उमेदवारी देण्याचे वृत्त फेटाळून लावले होते. अद्याप त्यांनी पक्षात प्रवेशही केला नसल्याचे सांगितले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)