कन्स्ट्रक्‍शन लोन (भाग-१)

बांधकामासाठी कर्ज हवे असेल तर अनेक किचकट गोष्टींचा सामना करावा लागतो. कन्स्ट्रक्‍शन लोनसाठी कर्जदाराला कन्स्ट्रक्‍शन टाइमटेबल, आराखडा, बजेट आणि कर्ज घेण्याचे कारण सांगावे लागते.

जर आपल्याला घर, कारखाना बांधण्यासाठी कर्ज हवे असेल तर बांधकाम कर्ज म्हणजेच कन्स्ट्रक्‍शन लोन हा एक चांगला पर्याय आहे. नवीन किंवा आपल्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी सर्वच जण प्रयत्नशील असतात. मनाप्रमाणे घर बांधण्याची सर्वांची इच्छा असते. मात्र, स्वत:चे घर, बिल्डिंग किंवा कारखाना उभारायचा असेल आणि त्यासाठी स्वत:जवळ पुरेसे भांडवल असते. अशावेळी कर्ज घेऊन आपली इच्छा पूर्ण करू शकतो. मात्र, बांधकामासाठी कर्ज हवे असेल तर अनेक किचकट गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कन्स्ट्रक्‍शन लोन म्हणजे काय, याची प्राथमिक माहिती जाणून घेऊ या.

कन्स्ट्रक्‍शन लोन कशाला म्हणतात?
कन्स्ट्रक्‍शन लोन हे शॉर्ट टर्म हंगामी कर्ज आहे. हे कर्ज कोणत्याही प्रकारचे बिल्डिंग, घर दुरुस्ती, डागडुजी किंवा घराचे विस्तारीकरण यासाठी घेतले जाते. बांधकामासाठी कर्ज घेणारा व्यक्ती हा अन्य कर्जदाराप्रमाणेच बॅंकेत हप्ते भरत असतो. कन्स्ट्रक्‍शन कर्जाचा दर हा प्राइम रेटच्या हिशेबानुसार बदलत राहतो. कन्स्ट्रक्‍शन लोनसाठी कर्जदाराला कन्स्ट्रक्‍शन टाइमटेबल, आराखडा, बजेट आणि कर्ज घेण्याचे कारण सांगावे लागते.

कर्जाचे दोन प्रकार
कन्स्ट्रक्‍शन टू परमनंट लोन :
कन्स्ट्रक्‍शन टू परमनंट लोनमध्ये आपण घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या पैशाला कर्जाऊ स्वरूपात घेऊ शकता. हा फॉरमॅट टू इन वन लोनप्रमाणे आहे. घर बांधण्यादरम्यान ग्राहक केवळ आऊटस्टॅंडिंग बॅलेन्सवरच व्याज भरतो. कन्स्ट्रक्‍शनच्या कालावधीदरम्यान ग्राहकांना व्हेरिएबल व्याजदर द्यावे लागते. कायमस्वरूपी मॉर्गेज केल्यावर आपल्याकडे कर्ज फेडण्यासाठी पंधरा ते 30 वर्षांचा कालावधी मिळतो आणि आपल्याला मुद्दल रक्कम आणि व्याज दोन्हींचा भरणा करावा लागतो.

कन्स्ट्रक्‍शन-ओन्ली लोन:
याप्रकारच्या कर्जामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज मिळते. पहिले म्हणजे घराच्या बांधकामासाठी देण्यात येणारे कर्ज जे की सर्वसाधारणपणे एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी असते. याशिवाय घरात काही बदल केल्यानंतर बांधकामाचा कर्ज भागविण्यासाठी मॉर्गेज कर्ज घेतले जाते. या प्रकारामध्ये ग्राहकांना डाऊनपेमेंटची गरज भासत नाही. ज्यांच्याकडे स्वत:चे घर असून ते दुसऱ्या घराचे बांधकाम करत आहेत अशासाठी हा एक स्मार्ट पर्याय आहे.

कन्स्ट्रक्‍शन लोन (भाग-२)

कन्स्ट्रक्‍शन लोन कसे मिळवावे?
कोणत्याही पारंपरिक मॉर्गेज लोनपेक्षा होम कन्स्ट्रक्‍शन कर्ज घेणे हे अधिक कठीण ठरू शकते. कन्स्ट्रक्‍शन लोन घेण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची गरज भासते. चांगला सिबिल स्कोर, कायमस्वरूपी उत्पन्न, लो डेट टू इन्कम रेशो, 20 टक्के डाऊनपेमेंट. याशिवाय कर्जदाराला घराचीं संपूर्ण माहिती सादर करावी लागते. यामध्ये घराचा आकार, घरांच्या बांधकामात वापरण्यात येणारे मटेरियल्स, साहित्य, ठेकदाराची माहिती आणि त्याचा परवाना क्रमांक आदींचा समावेश होतो.

– शैलेश धारकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)