कन्स्ट्रक्‍शन लोन (भाग-२)

बांधकामासाठी कर्ज हवे असेल तर अनेक किचकट गोष्टींचा सामना करावा लागतो. कन्स्ट्रक्‍शन लोनसाठी कर्जदाराला कन्स्ट्रक्‍शन टाइमटेबल, आराखडा, बजेट आणि कर्ज घेण्याचे कारण सांगावे लागते.

कन्स्ट्रक्‍शन लोन (भाग-१)

कर्ज कोठून घ्यावे?
अन्य पारंपरिक कर्जाच्या तुलनेत होम कन्स्ट्रक्‍शन लोन हे अधिक जोखमीचे मानले जाते. म्हणून बहुतांश बॅंक आणि फायन्शाशियल संस्था या अशा प्रकारचे कर्ज देण्याबाबत फारसे औत्सुक्‍य दाखवत नाहीत. कर्ज घेण्यापूर्वी त्याविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कर्ज देणाऱ्या बॅंकांचे शुल्क, प्रक्रिया शुल्क, हमी याबाबत चौकशी करा. लक्षात ठेवा ठेकेदारासमवेत काम करण्याअगोदर बांधकाम कर्जाची परवानगी घेऊन ठेवा.

कमी कालावधीचे कर्ज असे मिळवाः
दीर्घकाळासाठी जेव्हा बॅंक कर्ज देण्यास तयार होत नाहीत, अशा वेळी कमी कालावधीचे कर्ज (शॉर्ट टर्म लोन) उत्तम ठरू शकते. कमी कालावधी म्हणजेच एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी देण्यात येणारे कर्ज म्हणजे शॉर्ट टर्म कर्ज असे म्हटले जाते. जेव्हा बॅंकेकडून आपण दीर्घकाळासाठी कर्ज घेऊ शकत नाहीत, तेव्हा अशा प्रकारचे कर्ज फायदेशीर ठरते. या प्रकारच्या कर्जावर प्रिन्सिपल ऍडव्हान्स अमाऊंटवर हप्ते भरावे लागतात. कर्ज फेडण्याचा कालावधी देखील अन्य कर्जाच्या तुलनेत कमी असतो. खासगी फायनान्स कंपन्या किंवा बॅंक देखील अशाप्रकारचे शॉर्ट टर्म लोन ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना देतात.

कमी कालावधीच्या कर्जाला शॉर्ट टर्म फायनान्स किंवा शॉर्ट टर्म इन्स्टॉलमेंट देखील म्हणू शकतो. कारण त्यांना मासिक हप्त्यात फेडता येते.

शॉर्ट टर्म कर्जाची वैशिष्ट्ये
कमी कालावधीसाठी कर्ज घेणाऱ्या प्रत्येक कर्जदाराला मिळणारे लाभ वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. यासंदर्भात माहिती जाणून घेऊ या. आपण शॉर्ट टर्म किंवा पेड लोनसाठी वैयक्‍तिक कर्जदार किंवा एक उद्योजक म्हणून अर्ज करू शकतो. बहुतांश वित्तीय संस्था ग्राहकांच्या क्रेडिट हिस्ट्रीच्या आधारावर शॉर्ट टर्म कर्ज मंजूर करतात. मात्र, अनेक खराब क्रेडिट हिस्ट्री असणाऱ्या ग्राहकांना देखील कर्ज मिळते. खूपच कमी पेपरवर्कबरोबर कर्जासाठी ऑनलाइन अर्ज देखील करू शकतो. काही संस्थांमध्ये शॉर्ट टर्म लोन एक दिवसात मंजूर केले जाते. काही बॅंका शॉर्ट टर्म लोन 60 दिवस ते 120 दिवसांच्या कालावधीपर्यंत फेडण्याच्या योजना आणताना दिसतात.

कर्जासाठी आवश्‍यक कागदपत्रे
पॅनकार्ड, इन्कम प्रुफ, गेल्या तीन महिन्यातील सॅलरी स्लिप, रेसिडेन्सी प्रुफ, रेंट ऍग्रीमेंट, पासपोर्ट, लॅंडलाइन बिल, पोस्ट पेड मोबाईल बिल, बॅंक स्टेटमेंट, आयडेडिंटी प्रुफ, ड्रायव्हिंग लायनन्स, आधार, व्होटर आयडी, पासपोर्ट, गेल्या सहा महिन्यातील बॅंक स्टेटमेंट, एम्प्लॉयमेंट प्रुफ, ऑफर लेटर, फॉर्म 16, रिलिव्हिंग लेटर.

– शैलेश धारकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)