संविधानासाठी मोदी सर्वाधिक धोकादायक : काँग्रेस 

नागपूर : काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत, “जर संविधानाला कोणत्या नेत्याकडून धोका असेल तर ते नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत” असे वक्तव्य केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आजपासून विदर्भामध्ये काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली असून नागपूर येथील दीक्षाभूमीवर पत्रकारांना संबोधित करताना वासनिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणले, “आज संघर्ष यात्रेची सुरुवात करताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ज्या मोदींनी २०१४ मध्ये संविधानाला साक्षी ठेऊन पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेच मोदी आज संविधानासाठी घटक ठरत आहेत.”

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांनी २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, “२०१४मध्ये मोदींनी जनतेला मोठे मोठे वायदे करून भुरळ पाडली मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला नाही. मोदींच्या या फसव्या वृत्तीमुळे जनतेचा त्यांच्यावरचा रोष वाढत चालला आहे.”

“नुकत्याच झालेल्या ५ राज्यांतील निवडणुकांमध्ये जनतेने भाजपचा दारुण पराभव केला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मध्ये जनादेशाच्या बाता करणाऱ्या भाजपला येथील सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे.” असं देखील ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)