“द गर्ल ऑन द ट्रेन’च्या शुटिंगची तयारी परिणिती चोप्रा फारच जोरात करायला लागली आहे. तिने या सिनेमासाठी स्वतःचा मेक ओव्हर अगदी बदलून टाकला आहे. तिने आपल्या केसांनाही कलर केले आहे. या मेक ओव्हरची बातमी तिने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टवरून आपल्या चाहत्यांना दिली आहे. सलूनमधील एक फोटो तिने पोस्ट केला आहे.
त्याबरोबर “द गर्ल ऑन द रोड’च्या तयारीसाठी केसांना रंग लावत आहे, असेही तिने म्हटले आहे. मंगळवारीच तिने पुढच्या दोन महिन्यातले आपले शेड्युल खूप बिझी असल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली होती. याच दोन महिन्यात तिला काय काय करायचे आहे, त्याच्या चार महत्वाच्या कामांची यादीही तिने पोस्ट केली होती.
त्यामध्ये “द गर्ल ऑन द ट्रेन’चे शुटिंग संपवण्याचेही तिचे नियोजन आहे. हे शुटिंग पुढच्या तीन आठवड्यात सुरू होणार आहे. “द गर्ल…’ हे काही या सिनेमाचे खरे शिर्षक नाही. खरे शिर्षक अजून निश्चित व्हायचे आहे. सध्या सिद्धार्थ मल्होत्राबरोबरचा तिचा “जबरीया जोडी’ 2 ऑगस्टला रिलीज होणार आहे.