काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार

लखनौ – भाजपमधून नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी आज आपण कुटुंब प्रमुख व पती या नात्याने समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नी पूनम सिन्हा यांच्या प्रचार सभांमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी, शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या आघाडीकडून लखनौ लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी घोषित करण्यात आली होती.

दरम्यान, लखनौ मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आचार्य प्रमोद कृष्णम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या शत्रुघ्न सिन्हा हे आपली पत्नी पूनम सिन्हा यांच्या प्रचारसभेत सहभागी होणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता स्वतः शत्रुघ्न सिन्हा यांनीच याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून ते पत्नी पूनम सिन्हा यांच्या प्रचारसभांमध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

लखनौ येथून भाजपतर्फे जेष्ठ नेते राजनाथ सिंह यांना उमेदवारी देण्यात आली असून पूनम सिन्हा यांना समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर समाजवादी पक्षातर्फे काँग्रेसला लखनौमधून उमेदवार देऊ नये अशी विनंती करण्यात आली होती. मात्र काँग्रेसने लखनौमधून आचार्य प्रमोद कृष्णम यांना उमेदवारी दिल्याने शत्रुघ्न सिन्हा पक्ष की परिवार अशा संकटात सापडले होते. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांनी परिवाराला प्रथम प्राधान्य देत आपली बाजू स्पष्ट केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1118826848517906432

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)