गोव्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेसचा राज्यपालांकडे दावा; अल्पमतातील भाजप सरकार बरखास्त करण्याची मागणी 

पणजी : गोव्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने आज गोव्याच्या राज्यपालांकडे राज्यातील सर्वाधिक आमदारांचे संख्याबळ असणाऱ्या काँग्रेस पक्षास सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने गोव्याच्या राज्यपालांना लिहिलेल्या या पत्रामध्ये राज्यातील भाजप सरकार आपल्या पक्षाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या मृत्यूनंतर अल्पमतात गेले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
भाजपच्या या अल्पमतातील सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे तसेच राज्यातील सर्वाधिक आमदारांची संख्या असणाऱ्या कॉंग्रेस पक्षास सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करण्याची मागणी काँग्रेसद्वारे करण्यात आली असून या पत्रामध्ये काँग्रेसने राज्यपालांनी संविधानाच्या विरोधात जाऊन गोव्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल असा इशारा देखील दिला आहे.

https://twitter.com/ANI/status/1106894258953441280

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)