भाजपच्या मसूद ‘जी’च्या टीकेला काँग्रेसकडून हाफिज ‘जी’चे उत्तर

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्याने लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजप व मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते आपापल्या पक्षाचा प्रचार करताना एकमेकांवर शाब्दिक चकमक करताना दिसत आहेत. देशभरामध्ये निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागल्याने सोशल माध्यमांवरील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. सध्या सोशल माध्यमांवर नेत्यांनी केलेल्या भाषणांचे व्हिडीओज शेअर करण्याचा ट्रेंड आला असून विरोधी पक्षाच्या नेत्याने एखादा चुकीचा ‘शब्द’ वापरला तर त्याच शब्दाचे भांडवल सोशल मीडियावर होताना दिसते. सध्या सोशल माध्यमांवर राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर निशाणा साधतानाचा “भाजप सरकारने 1999 मध्ये मसूद अझर’जी’ ला कंदहार येथे नेऊन सोडून दिले याबाबत तुम्ही का बोलत नाही?” हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे.  या व्हिडीओमध्ये  पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याच्या नावाचा राहुल गांधी आदरार्थी उल्लेख करताना दिसत असल्याने सोशल माध्यमांवर त्यांच्यावर आगपाखड सुरु आहे. नेटकऱ्यांनी राहुल गांधींना #Rahulloveterrorist या हॅशटॅगद्वारे ट्रोल केले आहे तसेच भाजप पक्षातील जेष्ठ नेत्यांनी देखील आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधींविरोधात हा हॅशटॅग वापरला आहे.

आपले नेते राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रॉल असल्याचे दिसतानाच काँग्रेसच्या आयटी प्रमुखांनी देखील भाजपचे जेष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये भाजपचे जेष्ठ नेते रविशंकर प्रसाद हे हाफिज सईद या दहशतवाद्याचा हाफिज’जी’ असा आदरार्थी उच्चार करताना दिसत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून काँग्रेससमर्थक राहुल गांधींच्या बचावाच्या हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर रंगत असलेल्या या व्हिडीओ युद्धांमुळे आता नेत्यांना प्रचार सभांमध्ये बोलताना कमालीची सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

Hope this finds pride of place in BJP‘s revamped website,as& when it returns. BJP‘s admiration of Hafeez Saeed&his ilk. Also reminds us how they sent their special emissary to Pak,Ved P Vaidik, to have a dialogue with him&hug him. Hugplomacy began from there. #BJPLovesTerrorists pic.twitter.com/A75LHFg1eG

— Priyanka Chaturvedi (@priyankac19) March 12, 2019

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)