काँग्रेसला केवळ मलाईची चिंता तर आम्हाला भलाईची – मोदी 

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेहमीच भ्रष्टाचाराशी नाते राहिले आहे. आम्ही भलाईसाठी काम करत आहोत तर ते केवळ मलाईसाठी काम करत आहेत, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सोडले. ते अरुणाचल प्रदेशमधील प्रचार सभेत बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले कि, काँग्रेसचे नेहमीच भ्रष्टाचाराशी नाते राहिले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जे तुमच्या खिशातून पैसे चोरत आहेत. त्यांना दिल्लीतील आपल्या नेत्यांकडून प्रेरणा मिळत आहे. हे आयकर चोरी करतात, शेतकऱ्यांची जमीन चोरतात, वृत्तपत्र चालविण्यासाठी मोफतमध्ये घेतलेल्या जमिनींमधून लाखो रुपया भाडे कमवतात. सुरक्षा कराराची दलाली करून आपली मालमत्ता वाढवितात. जे जामिनावर आहेत ते चौकीदाराला शिव्या देत आहेत, असे मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता टोला लगावला.

सर्जिकल स्ट्राईक असू दे अथवा अन्य कोणतीही गोष्ट ज्यावर भारतीय गर्व करतात. त्याच गोष्टीचा विरोधक मजाक करतात. जगभरात भारताचा जेव्हा डंका वाजतो तेव्हा या लोकांचा जळफळाट होतो. आणि विरोधक ‘आतंकवाद्यांचे आका’ असल्यासारखे बोलतात, अशीही टीका मोदींनी विरोधकांवर केली.

https://twitter.com/ANI/status/1111882889686331392

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)