मलकापूर नगरपरिषद निवडणूक : काँग्रेसची एकहाती सत्ता

कराड - मलकापूर नगरपरिषद निवडणूकीत काँग्रेसची एकहाती सत्ता आल्यानंतर विजयी जल्लोष करताना काँग्रेसचे कार्यकर्ते.

सातारा – मलकापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक ही आगामी विधानसभेची सेमिफायनल समजली जात असल्याने या निवडणुकीत कॉंग्रेस व भाजपाच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र या नगरपरिषदेत काँग्रेसचा विजय झाला आहे.

पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांनी प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची कसलीही कसर दोन्ही गटाच्या नेत्यांनी सोडलेली नव्हती. त्यामुळे मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक चांगलीच रंगली होती. यामुळे संपूर्ण मलकापूर शहराचे लक्ष निकालाकडे होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसने 19-5 अशा फरकाने भाजपच्या अतुल भोसले यांच्या पॅनलचा पराभव करत नगराध्यक्षपदाची माळही आपल्या गळ्यात पाडली. काँग्रेसन 14 तर भाजपाने 5 जागांवर विजय मिळवला.

तर दुसरीकडे श्रीगोंदा जि. अहमदनगर नगरपरिषदेत काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष विजयी झाला आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेत आघाडीच्या शुभांगी पोटे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ. सारिका प्रशांत गावडे आणि राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्यावतीने नीलम धनंजय येडगे या नगराध्यक्षपदासाठी  निवडणूक रिंगणात होत्या. यामध्ये अखेर नीलम येडगे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या सारिका गावडे यांचा 270 मतांनी पराभव केला.

सविस्तर निकाल – एकूण जागा 19.
काँग्रेस 14, भाजप 5.
नगराध्यक्ष नीलम येडगे (काँग्रेस)

मलकापूर कुणाचे? : तर्कवितर्कांना मिळणार पुर्णविराम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)