बिहारमध्ये कॉंग्रेस लढवणार लोकसभेच्या 11 जागा

राजद आणि इतर पक्षांबरोबरच्या महाआघाडीवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील महाआघाडीवर गुरूवारी कॉंग्रेस, राजद आणि इतर लहान पक्षांनी शिक्कामोर्तब केले. महाआघाडीतील समझोत्यानुसार कॉंग्रेस त्या राज्यातील लोकसभेच्या 40 पैकी 11 जागा लढवणार आहे.

कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तब्बल आठ तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत महाआघाडीच्या जागावाटपाला अंतिम रूप देण्यात आले. त्यानुसार लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद सर्वांधिक 20 च्या आसपास जागा लढवेल. तर, उर्वरित जागा लहान पक्ष लढवतील. महाआघाडीत माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम), राष्ट्रीय लोक समाज पक्ष (रालोसप), लोकतांत्रिक जनता दल आणि शरद यादव यांच्या पक्षाचा समावेश आहे.

एचएएम आणि रालोसप हे पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडून महाआघाडीत दाखल झाले आहेत. दरम्यान, महाआघाडीच्या जागावाटपाची औपचारिक घोषणा 17 मार्चला पाटण्यात केली जाणार आहे. बिहारबरोबरच कॉंग्रेसने महाराष्ट्र, तामीळनाडू, कर्नाटक यांसारख्या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या राज्यांमधील आघाड्या निश्‍चित केल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)