काँग्रेसची वेबसाईट हॅक; हार्दिक पटेलचा आक्षेपार्ह फोटो 

अहमदाबाद – गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेलने काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर आता गुजरात काँग्रेसची अधिकृत वेबसाईट हॅक झाली असून त्यावर हार्दिक पटेलचे आक्षेपार्ह फोटो टाकले आहेत. ही घटना शुक्रवारी समोर आल्यानंतर काँग्रेसने तात्काळ वेबसाइट बंद केली.

२०१७ च्या निवडणुकीच्या वेळी हार्दिक पटेलचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यातील हॅकर्सनी हार्दिक पटेलशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीला एका मुलीसोबत असल्याचे दाखवत स्क्रीनशॉट घेतला आहे. या फोटोला कॅप्शन दिली कि, आमच्या नव्या नेत्याचे स्वागत आहे. ही घटना समोर येताच काँग्रेस प्रवक्ते मनीष दोशी यांनी तात्काळ वेबसाइट बंद केली.

-Ads-

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी भाजपाची अधिकृत वेबसाईटही हॅक करण्यात आली होती.

What is your reaction?
4 :thumbsup:
2 :heart:
10 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)