मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्यावेळी कॉंग्रेसच सत्तेवर होती : पंतप्रधान नरेंद्र मोदी  

भिलवाडा: सन 2008 मध्ये जेव्हा मुंबईवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी देशात कॉंग्रेस पक्षच सत्तेवर होता याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील एका प्रचार सभेत करून दिली. त्यावरून त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधताना आम्ही पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर मात्र ते शंका उपस्थित करतात अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की आम्ही पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भारतीय जवानांनी जे धैर्य दाखवले त्यावर शंका उपस्थित केली गेली. आता यापुढे असले हल्ले करताना कमांडोंना त्यांच्या पुराव्यासाठी शस्त्रांबरोबरच कॅमेरेही घेऊन जावे लागतील अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली. देशातील नक्षलवादी आणि दहशतवाद्यांना आमच्या सरकारने जशास तसे उत्तर दिले आहे. पण कॉंग्रेसला मात्र नक्षलवादी हे क्रांतीकारी वाटतात आणि ते त्यांना तशी सर्टिफिकीटे देतात असा आरोपही मोदींनी केला. राजस्थानात येत्याल 8 डिसेंबरला होंणाऱ्या प्रचार सभांसाठी पंतप्रधानांच्या या राज्यात मोठ्या प्रमाणावर जाहीरसभा आयोजित करण्यात आल्या आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)