कॉंग्रेसला कंत्राटावर काम करणारा पंतप्रधान हवा आहे – भाजपची टीका 

नवी दिल्ली – कॉंग्रेसला या देशात सहा-सहा महिन्याच्या कंत्राटावर काम करणारा आणि रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित करण्यात येणारा पंतप्रधान हवा आहे. पण देशाला मात्र नरेंद्र मोदी यांच्या सारखा समर्पित आणि सुयोग्य पंतप्रधान हवा आहे त्यामुळे जनता मोदींच्याच बाजूने उभी राहील असा दावा भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.

आज येथे पत्रकारांशी बोलताना नक्वी म्हणालेकी देशाच्या प्रगती, सुरक्षा आणि समृद्धीसाठी मोदी हेच सुयोग्य पंतप्रधान आहेत याची जनतेला खात्री पटली आहे असे त्यांनी म्हटले आहे. मोदींनी पाच वर्षात केलेल्या विकासामुळेच विरोधकांना पोटदुखी झाली असून त्यातूनच मोदींच्याविरोधात रोज नवीन आरोप करून त्यांना शिव्या घातल्या जात आहेत असे ते म्हणाले. भाजपपुढे प्रियांका गांधी या कोणतेच आव्हान निर्माण करू शकत नाहींत असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की प्रियांका गांधी यांचा प्रचार दौरा म्हणजे केवळ एक राजकीय पिकनिक असते. लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)