समाजवाद्यांना धोका देणारे लोक काँग्रेसचेच – अखिलेश यादव

उत्तरप्रदेश – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज उत्तरप्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारसभेमध्ये बोलताना काँग्रेसवर गर्विष्ठपणाचे आरोप लावले आहेत. ते म्हणाले, “समाजवादी विचारसरणीला जर कुणी धोका दिला असेल तर ते धोका देणारे काँग्रेसचे लोक आहेत. ही गोष्ट खरी आहे की आम्ही काँग्रेससोबत आघाडीमध्ये होतो मात्र काँग्रेस एवढी गर्विष्ठ असेल असं कधीच वाटलं नव्हतं.”

देशभरामध्ये सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये नवनवीन आघाड्या स्थापन झाल्या आहेत. अशातच लोकसभा जागांच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये देखील विविध राजकीय समीकरणे जुळवून आणली जात असून उत्तरप्रदेशात यंदा येथील प्रादेशिक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष व बहुजन समाजवादी पक्षाची आघाडी झाली आहे. सपा-बसपाच्या या भाजपविरोधी आघाडीमध्ये देशातील प्रामुख विरोध पक्ष असलेला काँग्रेस देखील सामील होईल अशी चिन्हं होती मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने काँग्रेसने उत्तरप्रदेशात स्वबळाची नारा दिला होता.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या आधी अनेकवेळा काँग्रेस सपा-बसपा सोबत आघाडीमध्ये नसली तरी आमचं उद्दिष्ट एकच असून ते भाजपला सत्तेमधून खाली खेचणं हे आहे असे वक्तव्य केलं आहे. मात्र आज पहिल्यांदाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसविरोधी टीका केली आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1121017056327897094

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)