पुणे- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची भेट सोलापुरात भेट घेतली आहे. या भेटीचा तपशील मात्र गुलदस्त्यातच आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरकरांनी सुशीलकुमार शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लगेचच ही भेट झाली, त्यामुळे शहरात सर्वत्र राजकीय चर्चा रंगत आहेत. तर दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
दरम्यान, सोलापुरातील यंदाची निवडणूक तिरंगी होणार आहे. कारण काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी मैदानात आहेत. सोलापूर लोकसभेसाठी येत्या 18 एप्रिलला मतदान होत आहे.