पंजाबमध्ये काँग्रेस प्रवक्त्याची गोळ्या झाडून हत्या

चंदिगड – पंजाब  जिल्ह्यातील फरिदाबादमध्ये दिवसाढवळ्या काँग्रेस प्रदेश प्रवक्ते विकास चौधरी  यांची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, विकास चौधरी सकाळी नऊच्या सुमारास  सेक्टर-9 मध्ये असलेल्या हुडा बाजारातील जिममध्ये जाण्यासाठी गाडीतून उतरले. यावेळी त्यांच्यावर अज्ञातांनी 5-6 गोळ्या झाडल्या. यामध्ये चौधरी गंभीर जखमी झाले. दरम्यान चौधरी यांना सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

भरदिवसा झालेल्या हत्येमुळे फरिदाबादमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. ही राजकीय हत्या असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here