काँग्रेसला झटका; पक्ष प्रवक्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला एक मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पक्षाचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. टॉम वडक्कन हे गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे होते. याशिवाय युपीए सरकारच्या काळात वडक्कन सोनिया गांधींचे सचिवही राहिले आहेत.

काँग्रेस सोडत भाजपत प्रवेश करण्यावर टॉम वडक्कन म्हणाले कि, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जेव्हा आपल्या देशावर हल्ला केला. त्यावेळी माझ्या पक्षांनी दिलेल्या प्रतिक्रिया मन दुखावणाऱ्या होत्या. राजकीय पक्ष देशाच्या विरोधात असणाऱ्या गोष्टींचे समर्थन करत असल्याने माझ्याकडे पक्ष सोडण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

https://twitter.com/ANI/status/1106108280114417664

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)