निरव मोदी अटकप्रकरणी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेऊन परदेशात फरार झालेल्या हिरे व्यापारी निरव मोदी ब्रिटन येथे आढळून आल्यानंतर त्याच्या विरोधातील कारवाईला वेग आला आहे. कालच लंडन येथील वेस्टमिनिस्टर कोर्टाने निरव मोदी याला अटक करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने दिलेल्या आदेशावर लंडन पोलिसांनी कारवाई केली असून निरव मोदी याला आज ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, निरव मोदी याला अटक करण्यात आल्यावरून काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून ते म्हणतात, “सत्ताधारी भाजपने निरव मोदी याला भारतीय बँकांचे पैसे बुडवून देशातून पळून जाण्यास मदत केली मात्र आता निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे भाजप सरकार निरव मोदी याला भारतामध्ये परत आणण्यासाठी हालचाली करत आहे.”

हे देखील वाचा : कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमधून अटक; आजच न्यायालयात करणार हजर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)