नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून भारतीय रुपयाच्या मूल्यात वेगाने घट होत आहे. यावर मोदी सरकारला टीकाकारांना सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसने रूपयाचे मूल्य डाॅलरच्या तुलनेत नीचांकावर गेल्याच्या मुद्यावरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली. 2014 च्या आधी रूपयाच्या घसरणीवर भाषण देणारे अाता गप्प का असा सवाल काॅग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे.

काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘घरसत रूपया,पोहचला 72 च्या पार,  आर्थिक नुकसान वाढणार, महागाईमुळे हाहाकार होतय’. पुढे त्यांनी म्हटलं की, ‘जे 2104 मध्ये रूपयाच्या घसरणीवर भाषण देत होते, ते आता मौन बाळगून का बसले आहेत. अर्थ मंत्र्यांना विचारलं तर ते आंतरराष्ट्रीय कारणच्या नावाखाली वेळ मारून नेतात’.

सुरजेवाला यांनी आरोप केला आहे की, ‘भाजपाच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान देखील होत आहे’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)