राफेल प्रकरणावरून कॉंग्रेसचा लोकसभेत पुन्हा हंगामा

नवी दिल्ली: कॉंग्रेसने आज पुन्हा लोकसभेत राफेल गैरव्यवहाराच्या जेपीसी चौकशीची मागणी करून जोरदार हंगामा केला. त्यामुळे कामकाजात अडथळे आले. सरकारनेही या प्रकरणी आम्ही चर्चेला तयार आहोत, कॉंग्रेस चर्चेपासून का पळ काढते आहे असा सवाल केला.

11 डिसेंबर पासून कॉंग्रेसकडून लोकसभेत हा विषय सातत्याने उपस्थित केला जात आहे. आजही शुन्य प्रहाराचे कामकाज सुरू होताच कॉंग्रेसचे सदस्य सभापतींच्या आसनापुढे जमून राफेल प्रकरणाच्या जेपीसी चौकशीची मागणी करीत राहिले. त्यासाठी त्यांनी जोरदार घोषणाबाजीहीं केली. हा विषय उपस्थित करताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले की या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना सरकार राफेल विमानाच्या किंमती का जाहीर करीत नाही?.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणाची जेपीसी चौकशी झाल्याशिवाय त्यातील तथ्य बाहेर येणार नाहीं असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर भाजप सदस्यांनीही जोरदार गदारोळ करून आक्षेप घेतला. यावर मध्येच हस्तक्षेप करताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की तोचतोच विषय पुन्हा उपस्थित केल्याने तथ्य बदलणार नाही. सरकार या विषयावर चर्चेसाठी तयार आहे, कॉंग्रेसने या चर्चेला सामोरे गेले पाहिजे.

दुपारी 2 वाजता पुरवणी मागण्यांचा विषय चर्चेला घेण्यात आला त्यावेळीही खर्गे यांनी जेपीसी चौकशीची मागणी केली. त्यावर अर्थमंत्री जेटली त्यांना म्हणाले की खर्गे यांनी या प्रकरणात लगेच चर्चेला सुरूवात करावी सरकार त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देईल. राफेल प्रकरणात कॉंग्रेस पक्ष खोटारडेपणा पसरवीत आहे असा आरोपही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)