अमरावती – महाराष्ट्रात उन्हाच्या झळांनी एकीकडे नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईने नागरिकांची झोप उडविली आहे. विहिरी, बोअर कोरडे पडल्याने पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. जनावरांच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान आता पाणी प्रश्नावरून अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सरकारी बैठकीत तीओसाच्या काँग्रेस महिला आमदार यशोमती ठाकूर या भलत्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला असून काँग्रेस आमदार या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना शिवीगाळ करताना दिसत आहेत.
#WATCH Yashomati Thakur, Congress MLA from Teosa, Maharashtra abuses public officials during an official meeting on water resources, in Amravati. (13.5.19) (Note – Abusive language) pic.twitter.com/0bqEDQtuMV
— ANI (@ANI) May 14, 2019
अधिकाऱ्यांना केलेल्या शिवीगळीच्या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “आम्ही गेल्या 2 आठवड्यांपासून प्रशासनाकडे पाणी सोडण्याची सातत्याने मागणी करत आहोत. आम्हाला अधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याची अपेक्षा होती मात्र तसे झाल नाही, म्हणून आम्हाला आक्रमक व्हावं लागलं. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील अपर वर्धा येथून पाणी सोडण्याची मागणी मान्य केली होती मात्र भाजप आमदाराने यात खोडा घातला.
“Yashomati Thakur, Congress MLA from Teosa: Authorities were supposed to release water but didn’t, so we had to become aggressive. We’ve been demanding release of water since last 2 weeks, Collector had also ordered release of water from Upper Wardha but BJP MLA intervened. (13.5) pic.twitter.com/0MT1W9uCem
— ANI (@ANI) May 14, 2019