अमेठी सह वायनाड मधूनही काँग्रेस अध्यक्ष लोकसभेच्या रिंगणात

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. मात्र आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए के अँटनी यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळ येथील वायनाड या दोन मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दाखल करणार आहेत अशी माहिती दिली.

केरळातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील राहुल गांधी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत केरळातील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी दाखल करावी अशी गळ घातली जात होती. आता काँग्रेस हायकमांडकडून वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)