कॉंग्रेसने केवळ मतपेढीचे राजकारण केले : मोदींचे प्रतिपादन 

अजमेर: कॉंग्रेसने आजवर केवळ मतपेढीचे राजकारण करीत लोकांमध्ये फूट पाडली आणि फक्त सत्ता उपभोगली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीरसभेत बोलताना केला. राजस्थानातील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजकीय यात्रेचा आज त्यांच्या सभेने समारोप झाला. ते म्हणाले की राजस्थानात एकदा कॉंग्रेस आणि एकदा भाजप असा सत्तेचा क्रम येथील जनतेने सातत्याने लावला आहे पण येथील जनता यावेळी पुन्हा भाजपलाच निवडून देऊन येथील राजकारणाची प्रथा यावेळी बदलून टाकेल असा आपल्याला विश्‍वास आहे.
ते म्हणाले की कॉंग्रेसने केवळ लोकांमध्येच व्होटबॅंकेसाठी फूट पाडली नाही तर नोकरशाहीतही त्यांनी हाच उद्योग केला त्यामुळे सरकारचे प्रशासनच ठप्प झाले होते. त्यांचे हे राजकारण केवळ निवडणुकीसाठी नसते तर अन्य वेळीही त्यांचा हाच प्रयत्न असतो. मतपेढीच्या आकारानुसार ते आर्थिक अंदाजपत्रकाची आखणी करीत असतात त्यामुळे विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होत असतो. ते म्हणाले की 60 वर्ष सत्तेत राहून कॉंग्रेसने काहीच काम केले नाही आता तर त्यांना विरोधी पक्ष म्हणूनही चांगली कामगीरी निभावता येत नाही असे ते म्हणाले. कशाला विरोध करायचा आणि कशाला नाही हेच त्यांना कळेनासे झाले आहे असे ते म्हणाले. राजस्थानातील अनेक घरांमध्ये अद्याप वीज पोहचलेली नाही पण राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर पुढील वर्षीच्या 2 ऑक्‍टोबर पर्यंत राजस्थानातील सर्व घरांमध्ये वीज पोहचलेली असेल असे आश्‍वासन त्यांनी दिले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)