कॉंग्रेस पक्षाचा अहंकार खूप मोठा-अखिलेश यादव 

कानपूर – समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. सपने कॉंग्रेसशी आघाडी केली होती. मात्र, त्या पक्षाचा अहंकार खूप मोठा असल्याचे आम्हाला आढळले, असे ते म्हणाले.
उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये झालेल्या सभेत बोलताना अखिलेश यांनी भाजपवरील शाब्दिक हल्लाबोल कायम ठेवताना कॉंग्रेसलाही लक्ष्य केले.

भाजपप्रमाणेच कॉंग्रेस पक्षही राजकीय विरोधकांना धाकदपटशा दाखवण्याच्या कृतीचा अवलंब करतो. केंद्रात सत्तेवर असताना कॉंग्रेसने माझे वडील आणि सपचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्याविरोधात सीबीआय चौकशी सुरू केली. कॉंग्रेसचा एक कार्यकर्ता आताही तेच करत आहे, असे अखिलेश म्हणाले. यादव कुटूंबाच्या विरोधातील बेहिशेबी मालमत्तेचे प्रकरण पुन्हा सुरू व्हावे, यासाठी कॉंग्रेसशी संबंधित एक जण प्रयत्नशील असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कॉंग्रेस हा मित्रांना फसवणारा पक्ष आहे.

कॉंग्रेस नव्हे तर सप-बसपची महाआघाडी भाजपला सत्तेपासून रोखेल, असा दावाही अखिलेश यांनी यावेळी केला. उत्तरप्रदेशातील महाआघाडीपासून सप आणि बसपने कॉंग्रेसला दूर ठेवले. तसे असले तरी ते पक्ष प्रामुख्याने भाजपलाच लक्ष्य करतील, असे मानले जात होते. मात्र, बसपच्या प्रमुख मायावती यांच्याप्रमाणेच अखिलेशही आता कॉंग्रेसवर निशाणा साधताना दिसत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)