कॉंग्रेस पक्ष भाजपची बी टीम

लक्ष्मण माने यांची टीका : पटोलेंच्या उमेदवारीला आक्षेप 
सातारा –
खैरलांजी प्रकरणातील मूळ राजकीय सूत्रधार नाना पटोले यांना कॉंग्रेसने भंडाऱ्यातून नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आयात केले आहे. विदर्भात कॉंग्रेसला उमेदवार मिळेनासे झाले आहेत त्यामुळे आम्हाला भाजपची बी टीम म्हणणाऱ्याचांच कॉंग्रेस पक्ष भाजपची बी टीम आहे अशी राजकीय टीका वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवकते पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केली.

येथील श्रीमान हॉटेलमध्ये लक्ष्मण माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 29 सप्टेंबर 2006 रोजी महाराष्ट्रात खैरलांजी हत्याकांड घडले. याचे देशपातळीवर दूरगामी परिणाम झाले. घटनेनंतर सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या या खटल्याचा निकाल 15 सप्टेंबर 2018 रोजी लागला. या हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे 20 जानेवारी 2017 रोजी निधन झाले. या खटल्यात ऍट्रॉसिटी दाखल न झाल्याने हे दलित हत्याकांड नसल्याचा निकाल भंडारा न्यायालयाने दिला.

या खटल्यात 11 पैकी 8 आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. तिन आरोपींना पुराव्याअभावी सोडून देण्यात आले. या हत्याकांडाचा राजकीय आश्रयदाता नाना पटोले यांना विदर्भात अजिबातच उमेदवार न मिळणाऱ्या कॉंग्रेसने भंडाऱ्यातून आयात करून नागपुरातून नितीन गडकरी यांच्या विरोधात उभे केले आहे. म्हणजेच गडकरींना इलेक्‍शन सोपी जावी हाच मूळ हेतू असून वंचित बहुजन आघाडीपेक्षा कॉंग्रेसच भाजपची बी टीम आहे अशी टीका माने यांनी केली. वंचितने महाराष्ट्रात बावीस उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरीत सव्वीस उमेदवारांची यादी मुंबई येथे जाहीर करणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात वंचितच्या सर्व मेळाव्यांना एक लाखापेक्षा अधिक मतदारांचा प्रतिसाद मिळाला त्यामुळे कोणाशीही आघाडी न करणारी वंचित आघाडी किमान पंधरा खासदार निवडून आणेल असा ठाम विश्‍वास माने यांनी व्यक्त करत पटोलेंना नागपुरात सक्षम पर्याय देणार असल्याचे स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)