‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट प्रदर्शित करण्याला कॉंग्रेसचा विरोध

नवी दिल्ली, दि.25 -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करण्याला कॉंग्रेसने विरोध दर्शवला आहे. त्या चित्रपटाचे प्रदर्शन रोखावे या मागणीसाठी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला.

अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत असणारा तो चित्रपट 5 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ओबेरॉय आणि चित्रपटाचे तीन निर्माते भाजपशी संबंधित असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. संबंधित चित्रपट राजकीय हेतूंनी प्रेरित आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा फायदा करून देणे हा त्या चित्रपटाचा उद्देश आहे, असा आरोपही कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेस शिष्टमंडळात कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, आर.पी.एन.सिंह आणि रणदीपसिंह सुरजेवाला यांचा समावेश होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here