राहुल गांधींना महिला आयोगाची नोटीस राजकीय हेतूने प्रेरित : कॉंग्रेस

File photo

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय महिला आयोगाकडून पाठवण्यात आलेली नोटीस राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका कॉंग्रेस पक्षाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूकीदरम्यान सोनिया गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी यांना नोटीस बजावणारा राष्ट्रीय महिला आयोग दुहेरी मापदंड अनुसरत आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्‍ते आनंद शर्मा यांनी केली. राहुल गांधी यांना महिला आयोगाकडून पाठवलेल्या नोटीसीबाबत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

विधानसभांच्या निवडणूकीच्या काळात पंतप्रधान सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह शब्दात आणि शैलीमध्ये बोलत होते, तेंव्हा महिला आयोग झोपला होता का ? त्यांनी पंतप्रधानपदाला आणि प्रतिष्ठेला न साजेसे वर्तन केले होते. ते आजही त्याच तऱ्हेने बोलत आहेत. पंतप्रधानांनाही महिला आयोगाने नोटीस बजावायला हवी, असेही शर्मा म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुल गांधी यांनी जयपूरच्या रॅलीमध्ये बोलताना संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते. 9 जानेवारीच्या प्रसार माध्यमांमधील वृत्ताचा दाखला घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)