राहुल गांधींना महिला आयोगाची नोटीस राजकीय हेतूने : काँग्रेस 

नवी दिल्ली : काँग्रेसने आज राहुल गांधी यांना राष्ट्रीय महिला आयोगाने पाठविलेल्या नोटिसीमागे राजकीय हेतू दडला असल्याचा आरोप केला आहे. यावेळी काँग्रेसकडून पक्षाध्यक्षांचा बचाव करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील राजकीय वातावरण दूषित करत असल्याचा आरोप लावण्यात आला.

काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी आज राष्ट्रीय महिला आयोगावर प्रखर टीका करताना, “महिला आयोग ‘द्विट्टप्पी’ धोरणातून कारभार करीत आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर महिला आयोग तत्परतेने नोटीस पाठवते तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीच्या भाणांमध्ये सोनिया गांधी यांच्याबद्दलच्या वापरल्या गेलेल्या अपमानजनक भाषेबद्दल इतक्या दिवसांनंतर देखील साधी नोटीसही पाठवली जात नाही.” असे वक्तव्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणांमधील हावभाव आणि भाषा पंतप्रधान पदावरील व्यक्तीला शोभा देते का? पंतप्रधान जेव्हा वारंवार सोनिया गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करतात त्यावेळी महिला आयोग झोपी जातो का?” असे तिखट प्रश्न आनंद शर्मा यांनी उपस्थित केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)