क्रांतीदिनी कॉंग्रेस,राष्ट्रवादीकडून मोदी सरकार ‘#ChaleJao’चा नारा !

मुंबई:भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील निर्णायक लढा ‘ऑगस्ट क्रांती’ चळवळीत झालेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या ७६ व्या वर्षापूर्तीनिमित्त आज राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. दरम्यान, कॉंग्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

कॉंग्रेसनेते अशोक चव्हाण म्हणाले, “देशाला १९४२ च्या क्रांतीने दिलेल्या धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही या मुल्यांचे जतन करण्यासाठी हुकुमशाही वृत्तीच्या भाजप सरकारविरोधात एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. आपण सर्वांनीच या जुलमी सरकारला पुन्हा एकदा #ChaleJao चा नारा देऊया आणि ही लढाई यशस्वी करूया.”

-Ads-

“योजना काँग्रेसच्या नाव भाजपाचं. कॉंग्रेसच्या योजनांची नावं बदलून त्याच योजना नव्या नावाने जनतेसमोर आणून विकासाचा खोटा दावा करणारे आकार्यक्षम मोदी सरकार #ChaleJao , चौकीदार की भागीदार? देशातल्या बँकांना देशोधडीला लावणाऱ्या उद्योगपतींना अभय देणारे मोदी सरकार #ChaleJao, अशा घोषणा कॉंग्रेसकडून देण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. चार वर्षानंतर नितीन गडकरी म्हणतात कुठे आहेत नोकऱ्या? खोटी आश्वासने देऊन देशातील युवकांचे भवितव्य अंधारात ढकलणारे खोटारडे सरकार चाले जाव, अशे म्हणत विरोधी पक्ष भाजप सरकारचा निषेध करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)