10 दिवसात शेतकरी कर्जमाफीचे आश्‍वसन कॉंग्रेसने पुरे करावे : शिवराज सिंह

नवी दिल्ली: दहा दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसने पुरे करावे. असे मध्य प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. आम्ही “हरा-भरा’ मध्य प्रदेश कॉंग्रेसच्या हवाली केला आहे. आता तो पुढे नेण्याचे काम कॉंग्रेसने करावे असेही त्यांनी नमूद केले.

राज्यपाल आनंदी बेन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशातील भाजपाच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी स्वीकारताना त्यांनी म्हटले आहे, की आता विरोधी पक्षही बलवान आहे. आमच्याकडे 109 आमदार आहेत. रचनात्मक सहकार्य हे माझे तत्त्व आहे, आता चौकीदारी करण्याचे काम आमचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील निवडणुकीपेक्षा (38टक्के) यावेळी आम्हाला मते जास्त मिळाली आहेत, (40 टक्के) मात्र आमच्या जागा कमी झाल्या आहेत. आम्हाला अपेक्षित यश मिळालेले नाही. आता तुम्ही केंद्र सरकारात जाणार का? या प्रश्‍नाला उत्तर देताना शिवराज सिंह म्हणाले, की नाही, माझा आत्मा मध्य प्रदेशातच रमतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)