#MamataVsCBI : राहुल गांधीचे ममतांना समर्थन तर दुसरीकडे काँग्रेस खासदाराकडून टीका 

नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये सीबीआय प्रकरणी झालेल्या विवादात काँग्रेसमध्ये दोन भूमिका दिसत आहेत. एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी धरणे आंदोलनाला बसलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठींबा दिला आहे तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाने ममता या नाटक करत असल्याचे म्हटले आहे.

कोलकत्याचे पोलीस प्रमुख राजीव कुमार हे चिट फंड घोटाळ्यांवरून चक्क सीबीआयच्या रडारवर आले आहेत. मात्र, त्यांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा लागल्यावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत. कुमार  यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत ममता बॅनर्जी ‘संविधान बचाव’ची घोषणा करीत काल रात्रीपासूनच धरणे आंदोलनाला बसल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले होते की, ‘ आम्ही संपूर्ण विरोधी पक्ष एकसाथ तुमच्या पाठीशी उभे राहू आणि या  फॅसिस्टवादी शक्तीना आपण हरवू’ असे म्हणत त्यांनी ममता यांना पाठिंबा दर्शविला होता. तर दुसरीकडे बंगालमधील काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नाटक करत आहेत’ असे म्हटले आहे. तसेच चिट फंड मध्ये करोडों रूपयांचा घोटाळा झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)