कॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर 

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. कोळंबकर यांनी त्यांच्या कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह फोटो असलेला एक बॅनर लावला आहे. या बॅनरमध्ये कॉंग्रेसचा कोणताही नेता दिसत नसल्यामुळे त्यांच्या भाजपाच्या प्रवेशांच्या चर्चांना उधाण आले आहे.

कोळंबकर हे नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जातात. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर हे विधानसभेवर निवडून आले आहेत. दरम्यान, कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आपला इरादा जाहीर केला आहे. यापूर्वी गणेशोत्सवातही कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)