काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा; अपक्ष लोकसभा लढवण्याचा निर्धार

औरंगाबाद – लोकसभा निवडणूकीसाठी अवघे काही दिवस उरल्यामुळे सर्वच पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. पण जसजशी उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत, तसतसे बंडखोर उमेदवारांची नावे समोर येत आहेत. सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. अशातच आमदार सुभाष झांबड यांच्या उमेदवारीला थेट विरोध करत काँग्रेसचे बडे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारत अपक्ष लोकसभा निवडण्याचा निर्धार केला आहे.

सुभाष झांबड यांच्या उमेदवरीबाबत विश्वासात घेतलं नसल्याचा दावा, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे नाराज होत अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत काँग्रेस सदस्यत्वासह जिल्हाध्यक्षपदही सोडलं आहे. तसेच अपक्ष लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसने औरंगाबामधून लोकसभेची उमेदवारी विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना दिली आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार आमदार सुभाष झांबड यांच्याविरोधात काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)