मुंबई – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी २ हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ६ हजार थेट बँक खात्यात करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
मात्र महाराष्ट्र काँग्रेसतर्फे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाला जुमलेबाजीचे धोरण असे म्हणत टीका केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबदल पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने महिन्याला ५०० रूपये अनुदान देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव अशा मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून भाजप सरकारने जुमलेबाजीचे धोरण कायम ठेवले आहे”.
तसेच त्यांनी युपीए सरकार आणि एनडीए सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची तुलना केली आहे.
1.माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी युपीए सरकारच्या काळात 60 हजार कोटी रूपयांची शेतकरी कर्जमाफी केली असल्याचे म्हटले आहे, तसेच याचा लाभ 3 कोटी शेतकऱ्यांना झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एनडीएच्या काळात मात्र कर्जमाफी झाले नसल्याचे काँग्रेसने दाखविले आहे.
2.तसेच युपीएच्या काळात 3.84 टक्क्यांनी प्रतिवर्ष कृषी उत्पादनात वाढ झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र एनडीए च्या काळात हीच वाढ प्रतिवर्ष केवळ 1.86 टक्के झाल्याचे दाखविले आहे.
3.युपीएच्या काळात म्हणजेच 2009 ते 2013 मध्ये 19.3 टक्के शेतकरी हमी भावात वाढ झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे तर हाच हमीभाव एनडीए सरकारच्या काळात (2014-17) 3.6 टक्के झाल्याचे म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने महिन्याला ५०० रूपये अनुदान देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव अशा मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून भाजप सरकारने जुमालेबाजीचे धोरण कायम ठेवले आहे. #AakhriJumlaBudget pic.twitter.com/72HwubnWuC— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 1, 2019
#Budget 2019 : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा