एनडीएसोबत मुसलमानांनी हातमिळवणी करण्याचे काँग्रेस नेत्याचे आवाहन 

नवी दिल्ली – राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा एकदा सत्तेत येण्याचे संकेत खुद्द एका वरिष्ठ काँग्रेस नेत्यानेच दिले आहेत. यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्ता प्रथापित करू शकते.अशा स्थितीत मुसलमानांनी दूर न जाता त्यांच्यासोबत यावे, असे आवाहन काँग्रेस नेता रोशन बेग यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर रोशन बेग काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

रोशन बेग यांनी म्हंटले कि, एनडीएचे सरकार पुन्हा प्रथापित झाले तर परिस्थितीशी तडजोड करण्याचे आवाहन मी मुसलमान बंधूना करतो. ते पुढे म्हणाले, आपल्याला कोणत्याही एका पक्षासोबत इमानदारी दाखवू नये. कर्नाटकमध्ये मुसलमानांसोबत काय झाले. काँग्रेसने केवळ एका मुसलमानाला उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, आगामी दिवसात तुम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेणार का? या प्रश्नावर बेग म्हणाले, गरज पडली तर नक्कीच निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

https://twitter.com/ANI/status/1130723992690745344

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)