कॉंग्रेसचे नेते पाकिस्तानातून निवडणूक जिंकतील – राम माधव 

गुवाहटी – कॉंग्रेसने पाकिस्तानात निवडणूक लढवली तर नक्की विजयी होईल, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस पक्ष आणि पाकिस्तान दोघेही खोट्याच गोष्टींचा प्रचार करत असतात, असेही ते म्हणाले.

कॉंग्रेसच्या नेते पाकिस्तानातील लोकांची भाषा वापरत असते. कॉंग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये आणि मते भारतापेक्षा पकिस्तानातच अधिक लोकप्रिय होत असतात. त्यामुळे कॉंग्रेसने जर पाकिस्तानची निवडणूक लढवली तर नक्की विजयी होईल. आपल्या विरोधी पक्षाची ही अवस्था झाली आहे, असे माधव पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.

सरकार, पार्टी आणि नेत्यांच्याविरोधात बोलण्यासाठी कॉंग्रेसजवळ कोणतही मुद्दा नाही. केवळ असत्य आणि पाकिस्तानवर कॉंग्रेसचा भरवसा उरला आहे. कॉंग्रेसला नक्की काय म्हणायचे आहे. कॉंग्रेसला देशाला नक्की कोणत्या दिशेने न्यायचे आहे, ते कॉंग्रेस पक्षामधील कोणालाही समजत नाही. लोकांनाही कॉंग्रेसची रणनिती काहीही समजत नाही आहे. कॉंग्रेस भारतासाठी लढत आहे की पाकिस्तानसाठी लढत आहे, हेच लक्षात येत नाही, असे ते म्हणाले.

कॉंग्रेसकडून केवळ भाजप सरकारच्या यशापयशावरच शंका घेतल्या जात नाहीत. तर भारतीय लष्करावरच शंका घेतल्या जात आहेत. लष्कराबाबत अवमानकारक वक्‍तव्येही केली जात आहेत, असेही माधव म्हणाले.

कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी 1,800 कोटी रुपये भाजपच्या बड्या नेत्यांना दिल्याचे वृत्त सपशेल खोटे आहे, असेही राम माधव म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)