काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन

सांगली – विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून उपचार सुरू होते. सांगली येथील कोकरूड या त्यांच्या मूळ गावी उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवाजीराव देशमुख हे 1996 ते 2002 मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद त्यांनी भूषवलं होतं. 1978, 1980, 1985 आणि 1990मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)