सुनंदा पुष्कर केस – न्यायालयाने शशी थरूर यांना परदेशी जाण्याची दिली परवानगी

नवी दिल्ली – काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांना परदेशी जाण्याची परवानगी मिळाली आहे. दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी सुनंदा पुष्कर मृत्यू केसप्रकरणी अारोपी शशी थरूर यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली आहे. अमेरिका, कॅनडा आणि जर्मनी यांच्यासह एकूण पाच देशात डिसेंबरपर्यत जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. तसेच अनेक अटीसुध्दा ठेवल्या आहेत, त्या अटींचे पालन थरूर यांना करावे लागेल.

याबरोबरच न्यायालयिन दंडाधिकारी समर विशाल यांनी म्हटले आहे की, थरूर यांच्याबाबत कोणतेही रेकाॅर्ड उपलब्ध नाही आहे जेणेकरून जे असं म्हणतील की काॅग्रेस नेता न्यायालयापासून पळू शकतात. तसेच न्यायालयिन दंडाधिकारी यांनी म्हटले आहे की, थरूर यांनी केसच्या चौकशी दरम्यान पुर्णपणे सहयोग दिला आहे. न्यायालयाने काॅग्रेस नेते थरूर यांना दोन लाख रूपये जमा करण्याचे सुध्दा आदेश दिला आहे. ही रक्कम त्यांना परत आल्यानंतर मिळणार आहे. याबरोबरच थरूर यांना साक्षी संदर्भात छेडछाड करू नये आणि साक्षीदारांना प्रभावित करू नये असा सक्त आदेशसुध्दा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)