तुला भरणा दरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर जखमी

तिरुअनंतपुरम – काँग्रेस पक्षाचे नेते आणि तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशी थरूर यांचा तुला भरणा दरम्यान अपघात झाला आहे. तिरुअनंतपुरम येथील मंदिरामध्ये ही घटना घडली. यामध्ये शशी थरूर गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिरुअनंतपुरम येथील मंदिरामध्ये पूजेच्या वेळी तुला करत असताना तोल जाऊन शशी थरूर खाली पडले. त्यानंतर शशी थरूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा डोक्याला ६ टाके पडले असून प्रकुती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

https://twitter.com/ANI/status/1117687138127159296

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)