निकालांमुळे कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाचा हृदयविकाराने मृत्यू

भोपाळ – मध्य प्रदेशमधील सिहोर येथे निवडणूक निकाल बघताना कॉंग्रेसच्या जिल्हा अध्यक्षाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. रतनसिंह ठाकूर असे त्यांचे नाव असून ते निवडणूक निकाल बघण्यासाठी मतमोजणी केंद्रात आले होते. पण अचानक ते बेशुद्ध झाले व खुर्चीवरून खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर निकाल काय लागतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. याच उत्सुकतेपोटी ठाकूर देखील आपल्या सहकाऱ्यांसह येथील मतमोजणी केंद्रात सकाळपासून आले होते. त्यातच देशभरात एनडीएची बहुमताकडे वाटचाल सुरू असून मध्य प्रदेशमध्येही अनेक ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांना भाजपने धूळ चारली. हे चित्र बघून ठाकूर अस्वस्थ झाले. त्यांच्या छातीत दुखायला लागले व ते खाली कोसळले.

मध्य प्रदेशमध्येही भाजपने आघाडी घेतली. 2014 सालीही लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. येथील 29 लोकसभा जागांपैकी 27 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. तर कॉंग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. पण तरीही मध्य प्रदेशमधील गुना आणि छिंदवाडा भाजपला जिंकता आला नव्हता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)