लोकसभा निवडणुकीतही कायम राहणार कॉंग्रेस-जेडीएस आघाडी 

बंगळूर – कर्नाटक पोटनिवडणुकीत मिळवलेल्या विजयामुळे त्या राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेस-जेडीएस आघाडीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यातून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी जाहीर केला आहे.

पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जेडीएसचे नेते असणारे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदा झाल्या. त्यामध्ये बोलताना दोघांनीही आगामी लोकसभा निवडणूक त्यांचे पक्ष एकत्रितपणे लढवणार असल्याचे स्पष्ट केले. आघाडी सरकारची धोरणे कर्नाटकमधील जनतेला भावल्याचे पोटनिवडणुकीतून स्पष्ट झाल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले. तशाच आशयाची प्रतिक्रिया राव यांनी दिली. कर्नाटकमधील जनतेने भाजपचे फुटीचे राजकारण आणि हुकूमशाही वर्तणूक नाकारल्याची टिप्पणीही त्यांनी केली.

कर्नाटकमधील सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस आणि जेडीएस हे पक्ष एकत्र आले. आता पोटनिवडणुकीच्या निकालाने त्यांच्यातील आघाडी कायम ठेवण्यासाठी अनुकूल संकेत दिले आहेत. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. कॉंग्रेस आणि जेडीएसने एकत्रित पुढील लोकसभा निवडणूक लढवल्यास त्या राज्यात भाजपपुढे तगडे आव्हान उभे राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)