माओवादाला खतपाणी घालणारे ‘काँग्रेस’ छत्तीसगड साठी धोकादायक : अमित शहा

संग्रहित छायाचित्र

रायपूर : भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज छत्तीसगड येथे काँग्रेसवर जोरदार निशाणा साधताना, काँग्रेस हा माओवादाला खतपाणी घालत असल्याने छत्तीसगड साठी काँग्रेस धोकादायक असल्याचे म्हंटले आहे. छत्तीसगड येथे येत्या १२ आणि २० नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका २ टप्प्यांमध्ये पार पडणार असल्याने राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. या पूर्वी कालच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला उद्देशून ‘शहरी नक्षलवादी’ अशी जहरी टीका केली होती.

दरम्यान आज बोलताना अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांचे तोंडभरून कौतुक करताना, “रमण सिंह यांनी छत्तीसगडच्या विकासासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. रमण सिंह यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील माओवाद जवळ जवळ संपुष्ठात आणला आहे. तसेच त्यांनी छत्तीसगडला भारतातील सिमेंट उत्पादन करणारे अव्वल राज्य बनवले असून विज निर्मिती क्षेत्रात देखील भरीव कामगिरी केली आहे.” अशी स्तुतिसुमने उधळली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)