एक पक्षीय सरकारांपेक्षा आघाडी सरकारं जास्त कार्यक्षम : मेहबूबा मुफ्ती 

श्रीनगर : पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी आज “एक पक्षीय सरकार पेक्षा आघाडी सरकारं जास्त कार्यक्षम असतात.” असं वक्तव्य केलं आहे. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी त्यांनी यावेळी केंद्रातील भाजप प्रणित सरकारचे उदाहरण देखील दिले.

काल नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्लाह यांनी जम्मू आणि काश्मीरच्या जनतेला कोणत्याही एका पक्षाला बहुमत द्यावे असे आवाहन केले होते. अब्दुल्लाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मेहबूबा मुफ्ती यांनी ही प्रतिक्रिया दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“इंदिरा गांधी यांच्यानंतर सत्तेत आलेल्या आघाडी सरकारांनी आपली कार्यक्षमता एक पक्षीय सरकारांपेक्षा जास्त असल्याचे सिद्ध केले आहे. वाजपेयी यांचं बहुपक्षीय सरकार हे सध्याच्या भाजप सरकारपेक्षा अधिक कार्यक्षम होत.” असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)