कर्जमाफीच्या नावाखाली काँग्रेसकडून शेतकऱ्यांची दिशाभूल : मोदी 

धर्मशाला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेश येथील मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने धर्मशाला येथे ‘जन आभार’ सभा घेतली. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसने तीन राज्यांमध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीवर जोरदार हल्ला चढविताना “काँग्रेस हे शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे.” असा आरोप केला.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी, “शेतकरी कर्जमाफी केल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींना चैन पडू देणार नाही.” अशी वल्गना केली होती. राहुल गांधींच्या या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज, ‘काँग्रेसची शेतकरी कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल आहे.’ असे वक्तव्य केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेश मधील विविध क्षेत्रांमध्ये २६,००० करोड रुपयांची विकास कामे सुरु आहेत. ‘हिमाचल प्रदेश ही शूरवीरांची भूमी असून येथील जवान सीमेवर सदैव आपल्या प्राणांची बाजी लावत असतात’ अशा शब्दांमध्ये त्यांनी हिमाचल प्रदेशची स्तुती देखील केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)