उत्तरप्रदेशात आता कॉंग्रेसही आक्रमक; राज्यातील सर्व 80 जागा लढवणार

File photo

नवी दिल्ली- बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेशात कॉंग्रेसला वगळून आघाडी करण्याची घोषणा केल्यानंतर आता कॉंग्रेसही आक्रमक झाली असून आज त्यांनी उत्तरप्रदेशातील सर्व 80 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. आज उत्तरप्रदेशातील स्थितीच्या संबंधात गुलामनबी आझाद आणि उत्तरप्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांच्यात चर्चा झाली त्यानंतर आझाद यांनी ही घोषणा केली.

ते म्हणाले की या 80 जागा अत्यंत आक्रमकपणे लढवणचा निर्णय आम्ही घेतला असून त्यासाठी त्या राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून राहुल गांधी यांच्या 13 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक सहा लोकसभा मतदार संघांच्या परिसरात एक सभा या प्रमाणे या सभांचे नियोजन केले जाणार आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की लोकसभेची निवडणूक ही प्रामुख्याने कॉंग्रेस आणि भाजप या दोन पक्षांतच होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्थात आम्ही या निवडणूकीसाठी सर्व समविचारी पक्षांची मदत घेणार आहोत आणि भाजपला पराभूत करणाऱ्या पक्षांचाही आम्ही सन्मान करणार आहोत. या निवडणुकीसाठी आम्ही राहुल गांधी यांच्या सभांचेही नियोजन केले असून पहिल्या टप्प्यात पश्‍चिमी उत्तरप्रदेशात त्यांच्या सभा होणार आहेत. पहिली सभा हापुर येथे होईल. त्यानंतर मोरादाबाद आणि सहारनपुर येथील पहिल्या टप्प्याच्या सभा होणार आहेत असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)